संगमेश्वर:- साखरपा मुर्शी तपासणी नाक्यावर बिबट्याचा वावर आढळून आला. शनिवार पहाटेच्या दरम्यान या परीसरात महामार्गावरुन प्रवास करणाऱ्या वाहन चालकांसमोर बिबट्या रत्नागिरी कोल्हापूर महामार्गावर अचानक आला. नंतर तो बाजुच्या जंगलमय भागात गेला. हा प्रकार साखरपा पोलीस चेकपोस्ट येथील सीसीटीव्ही मध्ये चित्रित झाला आहे. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर पोलिसांची मात्र भंबेरी उडाली आहे.
काही दिवसांपुर्वी त्याच परिसरातील चार ते पाच कुत्रे बिबट्याने मारल्याने आता बिबट्या सवयीने नागरी वस्तीत सातत्याने वावरत असल्याने परिसरात सर्वत्र घबराट पसरलेली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, साखरपा मुर्शी पोलीस तपासणी नाक्यावर महामार्गाजवळ बॅरिकेट्स लावलेल्या ठिकाणी आज शनिवारी पहाटेच्या दरम्यान या परिसरात महामार्गावरुन प्रवास करणा-या वाहन चालकांसमोर बिबट्या रत्नागिरी कोल्हापूर ह्या महामार्गावर अचानक समोर आला. नंतर तो बाजुच्या जंगलमय भागात गेला. हा प्रकार साखरपा पोलीस चेकपोस्ट येथील सीसीटीव्हीमध्ये चित्रित झाला आहे. साखरपा, मुर्शी, जाधववाडी या गावांच्या सीमेनजीक पहाटे दरम्यान या परीसरात महामार्गावरुन प्रवास करणाऱ्या वाहन चालकांना बिबट्या दिसत आहे. तसेच मागील आठवड्यात याच परिसरातील चार ते पाच कुत्रे त्याने मारले आहेत. हा बिबट्याचा वावर होत असलेला परिसर मुख्य नागरी वस्तीचा भाग असल्याने या परिसरात राहणाऱ्या नागरिकांमध्ये आता भीतीचे वातावरण आहे.