रत्नागिरी:- बांधकाम सुरु असलेल्या घरातील बेडरुममधील लोखंडी बाराला नॉयलॉनची दोरी बांधून तरुणाने आत्महत्या केली. जयगड पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. राकेश वामन आलीम (वय २०, रा. सांडेलागवण, खालचीवाडी-रत्नागिरी) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे.
ही घटना बुधवारी (ता. ८) सकाळी सव्वासातच्या सुमारास प्राथमिक आरोग्य केंद्र वाटद-खंडाळा येथे घडली. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार राकेश आलीम याने विरेंद्र बेंद्रे यांच्या बांधकाम सुरु असलेल्या घरातील बेडरुम मधील लोखंडी बाराला नायलॉनची रस्सी बांधून गळफास घेतलेल्या स्थितीत निदर्शनास आली. नातेवाईकांनी त्याच्या गळ्याला बांधलेली रस्सी कोयतीने कापून खाली उतरवून तत्काळ उपचारासाठी प्राथमिक आरोग्य केंद्र वाटद-खंडाळा येथे दाखल केले. तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासून मृत घोषित केले.