सांगली-राजापूर बसचा ब्रेक फेल झाल्याने अनुस्कुरा घाटात अपघात

चालकाच्या प्रसंगावधानाने प्रवासी बचावले

पाचल:- सांगलीहून राजापूरच्या दिशेने याणाऱ्या बसला अनुस्कुरा घाटात आज सोमवारी सकाळी 10.30 वाजता ब्रेक फेल झाल्यामुळे अपघात झाला. मात्र यावेळी चालक एस. आर कुर्णे यांनी प्रसंगावधान राखत गाडी डोंगराच्या दिशेने घातल्याने मोठा अपघात टळला. त्यांच्या खबरदारीमुळे 50 प्रवाशांचा जीव वाचला. अन्यथा गाडी दरीत कोसळून मोठी जीवितहानी झाली असती. या बसमध्ये जवळपास 50 प्रवासी होते.

सर्व प्रवाशी सुखरूप आहेत. दरम्यान या गाडीने राजापूर पोलीस उपनिरीक्षक सुधीर उबाळे, पाचल तलाठी सतीश शिंदे व राजापूर बस व्यवस्थापक हे देखील प्रवास करीत होतें, त्यांनीही मोठया अपघातातून वाचल्याची प्रतिक्रिया दिली.

आगाराचा गलथान कारभार

राजापूर आगारातून सुटणाऱ्या अनेक गाड्याचे प्रॉब्लेम आहेत. अनेक नादुरुस्त गाडया वाहन चालकांच्या ताब्यात दिल्या जातात. त्यामुळे वाहन चालकासह प्रवाशांच्या जीवावर बेतू शकते. आगाराने गाड्यांची तंदुरुस्ती मगच वाहन चालकांच्या ताब्यात द्याव्यात. त्यामुळे मोठे अनर्थ टळतील अन्यथा अपघाताला आगाराला जबाबदार धरले जाईल. याचा विचार करून वेळीच लक्ष देण्याची मागणी होत आहे.