सलग दुसऱ्या दिवशी कोरोना रुग्णसंख्या शंभरी पार; 24 तासात 116 पॉझिटिव्ह

रत्नागिरी:- जिल्ह्यात कोरोनाचे संक्रमण  मोठ्या प्रमाणावर होऊ लागले आहे. मागील 24 तासात जिल्ह्यात 116 नवे पॉझिटिव्ह रुग्ण सापसले आहेत. सापडलेल्या 155 पैकी 97 रुग्ण आरटीपीसीआर चाचणी केलेले तर 19 रुग्ण अँटीजेन टेस्ट केलेले आहेत. शुक्रवारी जिल्ह्यात 155 रुग्ण सापडले होते आणि आज 116 असे दोन दिवसात एकूण 261 कोरोना बाधित रुग्ण आढळून आले आहेत.  

पॉझिटिव्ह रुग्णांचा वाढता आकडा चिंताजनक असून शनिवारी जिल्ह्यात 116 नव्या रुग्णांची भर पडली. यामुळे आता जिल्ह्यातील पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या आता 11 हजार 378 वर जाऊन पोहचली आहे. मंगळवारी आलेल्या अहवालात 97 रुग्ण आरटीपीसीआर चाचणीत तर 19 रुग्ण अ‍ॅन्टीजेन चाचणीत पॉझिटिव्ह सापडले आहेत.जिल्ह्यात आज 668 जणांचे कोरोना अहवाल निगेटिव्ह आले आहेत तर आतापर्यंत एकूण 102032 अहवाल निगेटिव्ह आले आहेत.

चोवीस तासात 49 रुग्ण बरे झाले असून आतापर्यंत 10 हजार 253 जण कोरोनामुक्त झाले आहेत. जिल्ह्यात कोरोना रिकव्हरी रेट 90.11 टक्के आहे. मागील चोवीस तासात जिल्ह्यात कोरोनाने एका रुग्णाचा बळी गेला असूूून जिल्ह्यात कोरोना बळींची संख्या 378 इतकी आहे. जिल्ह्यात मृत्यूचे प्रमाण 3.32 % आहे.

जिल्ह्यातील आज सापडलेल्या 116 पॉझिटिव्ह रुग्णांमध्ये रत्नागिरी तालुक्यातील 32, दापोली 1, खेड 6, गुहागर 8, चिपळूण 21, राजापूर 12, लांजा 9 आणि संगमेश्वर तालुक्यात 27 रुग्ण सापडले आहे. जिल्ह्यात कोरोना संक्रमित होण्याचे प्रमाण 10.03% आहे.