सरत्या वर्षाला निरोप; नववर्षाचे जल्लोषात स्वागत 

रत्नागिरी:- सरत्या वर्षाला निरोप देताना जिल्’ात नववर्षाचे जल्लोषी स्वागत करण्यात आले. नववर्षाच्या स्वागतसाठी अवघी तरूणाई रस्त्यावर आली होती. एसएमएसला बगल देऊन व्हॉट्सअ‍ॅपच्या जमान्यात अनेकांनी सोशल मिडीयाच्या माध्यमातून एकमेकांना शुभेच्छा दिल्या. रात्री उशिरापर्यंतची रोषणाई आणि विविध कार्यक्रमांनी सरत्या वर्षाला निरोप देताना नववर्षाचे स्वागत करण्यात आले.
 

नाताळ सणानंतर आता नववर्षाच्या स्वागतसाठी कोकणात हजारो पर्यटक दाखल झाले. यावर्षी नववर्षाच्या स्वागतासाठी पर्यटकांनी कोकणाची निवड केल्याने गतवर्षीच्या तुलनेत दुप्पट पर्यटक कोकणात दाखल झाले. पर्यटकांचा सर्वाधिक ओढा रत्नागिरी आणि सिधुदुर्ग राहील्याने दोन्ही जिल्हातील हॉटेल्ससह एमटीडीसीची रिसॉर्टदेखील फुल्ल झाली होती. सेलिब्रेशनसाठी पर्यटकांची पहिली पसंती समुद्रकिनार्यांना राहील्याने नववर्षाच्या स्वागतासाठी समुद्रकिनारे गजबजले होते. 

जिल्ह्यात दाखल झालेल्या पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी हॉटेल व्यावसायीकांनी नववर्ष स्वागतासाठी विशेष योजना राबवली होती. कोरोनामुळे अनेकांनी पार्ट्यांचा बेत टाळून हॉटेलमध्ये नववर्षाचे स्वागत करण्याला पसंती दिली. नववर्षाचे स्वागत करण्यासाठी रात्री उशिरापर्यंत रस्त्यांवर वर्दळ सुरू होती. एकमेकांना शुभेच्छा देण्यासाठी यावेळी एसएमएस पध्दतीला बगल देऊन सोशल मिडीयाचा वापर करण्यावर भर अधिक होता. प्रत्येकजण आपल्या पध्दतीने एकमेकांना नववर्षाच्या शुभेच्छा देत होता. 

यावर्षी  कोकणाकडे वळणार्या पर्यटकांची संख्या अधिक होती. दरवर्षीच्या तुलनेत गोव्याकडे जाणाºया पर्यटकांनी गोव्याकडे पाठ फिरवत सिंधुदुर्ग आणि रत्नागिरीला सर्वाधिक पसंती दिल्याचे दिसून आले. ख्रिसमस सेलिब्रेशननंतर अनेक पर्यटकांनी रत्नागिरी आणि सिंधुदुर्गला हजेरी लावली. यामुळे मागील तीन दिवसांपासून दोन्ही जिल्ह्यामधील समुद्रकिनारे अक्षरश: हाऊसफुल्ल होते. मागील दोन दिवस पर्यटकांनी मोठ्या प्रमाणावर हजेरी लावल्याने महामार्गावर मोठ्या प्रमाणावर वाहनांच्या रांगा होत्या. जिल्ह्यातील सागरी मार्ग देखील फुल्ल असल्याचे चित्र होते. मंगळवारी रात्री उशिरापर्यंत पर्यटकांनी समुद्रकिनाऱ्यावर हजेरी लावली होती. पर्यटकांच्या सुरक्षा व्यवस्थेसाठी पोलीस यंत्रणेनेही विशेष काळजी घेतली होती.