सन्मानजनक जागा मिळाल्यास जिल्ह्यात महाविकास आघाडी

राष्ट्रवादीची भूमिका; चर्चेची तयारी

रत्नागिरीः– राज्यात महाविकास आघाडी असल्याने जिल्ह्यातहि त्याची अंमलबजावणी करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी तयार आहे. परंतु स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत राष्ट्रवादीला सन्माननिय जागा मिळाल्या पाहिजेत तरच महाविकास आघाडी शक्य आहे. आमची चर्चेची तयारी आहे. निमंत्रण आले तर पक्षाचे वरीष्ठ नेते चर्चा करण्यासाठी पुढे येतील असा विश्वास राष्ट्रवादीचे प्रंतिक सदस्य बशीर मुर्तूझा यांनी व्यक्त केला. 

सुमारे आठ महिन्यानंतर रत्नागिरी पालिकेची सार्वत्रिक निवडणुक आहे. त्यापुर्वी ग्रामपंचायतीच्या निवडणुका होणार आहे. राज्यस्तरावर शिवसेना,राष्ट्रवादी, काँग्रेस यांची महाविकास आघाडी आहे. जिल्हास्तरावरही हाच फार्म्युला वापरून विरोधकांना भुईसपाट करण्याच आमचा प्रयत्न आहे. परंतु अद्याप तिन्ही पक्षाची एकत्रित बोलणी झालेली नाही. कोरोनाचा प्रार्दुभाव संपल्यानंतर राष्ट्रवादीची चर्चेची तयारी आहे. शहरात राष्ट्रवादीचीहि ताकद आहे हे निवडणुकीत दिसेल. महाविकास आघाडी करताना राष्ट्रवादीला सन्माननिय जागा मिळायला पाहिजेत असे श्री.मुर्तुझा यांनी सांगितले.

राज्यात सरकारमध्ये राष्ट्रवादी सहभागी असल्याने अशासकीय  समित्यांचे सदस्य, विशेष कार्यकारी अधिकारी नेमताना राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांचा प्रधान्याने विचार व्हावा अशी विनंती पालकमंत्र्यांना केली जाणार आहे. येणार्या निवडणुकांच्या दृष्टीने राष्ट्रवादी सज्ज असल्याचे श्री.मुर्तुझा यांनी सांगितले.