रत्नागिरी:- शहरानजीकच्या सडामिर्या येथे पूर्ववैमनस्यातून भररस्त्यात महिलेच्या दुचाकीवर लाथ मारुन तिला पाडण्याचा प्रयत्न करत ठार मारण्याची धमकी दिली. याप्रकरणी तरुणीविरोधात शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.ही घटना मंगळवारी सायंकाळी 6.30 वा.सुमारास घडली.
पूजा सुकांत सावंत (रा.सडामिर्या,रत्नागिरी) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयित तरुणीचे नाव आहे. तिच्याविरोधात स्वप्नाली सुकांत सावंत (32,रा.तरवळ सुतारवाडी,रत्नागिरी) यांनी तक्रार दिली आहे.त्यानुसार,मंगळवारी सायंकाळी त्या त्यांंच्या सासरी सडामिर्या येथील नवलाई मंदिरामध्ये आपल्या मुलीसह गेल्या होत्या.तिथून परतताना पूजा सावंत हिने पाठीमागून येउन स्वप्नाली सावंत यांच्या दुचाकीवर लाथ मारुन त्यांना पाडण्याचा प्रयत्न केला. तसेच मी तुला गावात पाय ठेवायचा नाही असे सांगितले होते. तुझी हिम्मत कशी झाली इकडे यायची पुन्हा इकडे यायचे नाही. एकदा माझ्या हातून वाचलीस आता तुझा मुडदाच पाडेन अशी धमकी देत पुढे जाउ दिले नाही. असे स्वप्नाली सावंत यांनी दिलेल्या तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.याप्रकरणी अधिक तपास शहर पोलिस करत आहेत.