रत्नागिरी:- शहरानजीकच्या सडामिऱ्या येथील प्रौढाला अशक्तपणा जाणवू लागल्याने उपचारासाठी जिल्हा शासकिय रुग्णालयात दाखल केले होते. उपचार दरम्यान त्यांचा मृत्यू झाला. शहर पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. महेश शरद मोघे (वय ५२, रा. सडामिऱ्या रत्नागिरी) असे मृत प्रौढाचे नाव आहे. ही घटना शनिवारी (ता.२०) दुपारी साडेचारच्या सुमारास जिल्हा रुग्णालयात घडली.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार महेश यास मानसिक आजार होता. त्यामध्ये त्यांना अशक्तपणा जास्त जाणवू लागल्याने उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल केले होते. मात्र उपचार दरम्यान त्यांचा मृत्यू झाला.