रत्नागिरी:- संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियानांतर्गंत 2022-23 मधील रत्नागिरी जिल्हा परिषद स्तरावर सहभागी ग्रामपंचायतींच्या जिल्हास्तरीय तपासणीत गुहागरमधील खामशेत ग्रामपंचायतीने प्रथम कमांक पटकावला आहे. तर रत्नागिरी तालुक्यातील कोतवडे ग्रामपंचायत द्वितीय कमांक तर गुहागरमधील कौंढर-काळसूर ग्रामपंचायत तृतीय स्थान पटकावले आहे.
ग्रामीण स्वच्छता कार्यकमाचा मूळ उद्देश ग्रामीण जनतेचे आरोग्यमान उंचावण्याचा आहे. मात्र ग्रामीण भागात अशुध्द पाण्यामुळे, अस्वच्छ परिसरामुळे व वैयक्तिक स्वच्छतेअभावी अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. त्यासाठी शासनाच्या पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाने संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान राज्यात सुरू केले. या अभियानात जिल्हास्तरावर जि.प.गटांमधील पथम कमांकाच्या ग्रामपंचायतींमधून सर्वात जास्त गुण पाप्त करणाऱया फक्त 1 ते 9 कमांकाच्या ग्रामपंचायतींची तपासणी जिल्हास्तरीय तपासणीकडून करण्यात आली होती.
त्या समितीच्या अहवालानुसार जिल्हास्तरावर पथम, द्वितीय व तृतीय खढमांकाच्या ग्रामपंचायतींची निश्चित करण्यासाठी जि.प.सीईओ किर्तीकिरण पुजार यांच्या आदेशान्वये तपासणी पथकांनी पथम, द्वितीय व तृतीय कमांकासाठी निवड करण्यात आली आहे. त्या सहभागी ग्रामपंचायतींपैकी जिल्हास्तरावर पात्र ठरलेल्या ग्रामपंचायतींचा निकाल जाहीर करण्यात आला आहे.
त्यामध्ये पथम कमांक गुहागर तालुक्यातील खामशेत ग्रामपंचायतींने पटकावला आहे. या ग्रामपंचायतीला 6 लाखांचे पारितोषिक जाहीर करण्यात आले आहे. द्वितीय कमांक रत्नागिरी तालुक्यातील कोतवडे ग्रामपंचायतींने पटकावला असून 4 लाखांचे पारितोषिक जाहीर झ्घले ओ. तृतीय कमांक गुहागर तालुक्यातील र्कौढर-काळसूर या ग्रामपंचायतीने पटकावला आहे. या ग्रामपंचायतीला 3 लाखांचे पारितोषिक जाहीर झाले आहे.
तसेच उर्वरित ग्रामपंचायतींमध्ये विशेष पुरस्कारासाठी पुढील ग्रामपंचायतींची निवड करण्यात आली आहे. त्यामध्ये स्व. वसंतराव नाईक पुरस्कार (सांडपाणी व्यवस्थापन) या पुरस्कारासाठी देखील रत्नागिरी तालुकयातील कुरतडे ग्रामपंचायती निवड करण्यात आली आहे. डाŸ. बाबासाहेब आंबेडकर पुरस्कार (पाणी गुणवत्ता व पाणी व्यवस्थापन ) संगमेश्वरमधील कोंड असुर्डे ग्रामपंचायतीला जाहीर झाला आहे. स्व. आबासाहेब खेडकर पुरस्कार (शौचालय व्यवस्थापन) गुहागरमधील मुंढर कातकिरी ग्रामपंचायतीला जाहीर झाला आहे. या तीनही ग्रामपंचायतींना पत्येकी 50 हजाराची रक्कम पुरस्कार म्हणून मिळणार आहे.