रत्नागिरी:- रत्नागिरी जिल्हा प्राथमिक शिक्षक सहकारी पतपेढी संचालक मंडळाच्या दि.4 नोव्हेंबर रोजी होणाऱ्या निवडणुकीसाठी प्राथमिक शिक्षक समितीला कास्ट्राईब शिक्षक संघटना, शिक्षक सेनेने आपला पाठिंबा जाहीर केला आहे.
महायुतीतर्फे तालुका सर्वसाधारण मतदारसंघातून मंडणगड-सचिन चांदिवडे, दापोली-अशोक मळेकर, खेड-शरद भोसले, चिपळूण-अमोल भोबसकर, गुहागर-नरेंद्र देवळेकर, संगमेश्वर-रमेश गोताड, रत्नागिरी-प्रवीण देसाई, लांजा-संजय डांगे, राजापूर-विजय खांडेकर यांना उमेदवारी देण्यात आली आहे. जिल्हा राखीव सर्वसाधारण मतदारसंघातून खेडचे सुनिल दळवी, देवरूखचे नरेश सावंत, इतर मागास प्रवर्ग संघातून लांजा तालुक्यातील उमेश केसरकर, अनुसुचित जाती-जमाती मतदारसंघातून चिपळूणचे मनोज म्हस्के, भटक्या जाती-जमाती मतदारसंघातून संगमेश्वरचे श्री.मुकुंद वाजे, महिला राखीव मतदारसंघातून राजापुरच्या प्रांजली धामापूरकर, रत्नागिरीच्या नाझिमा मालीम यांना उमेदवारी देण्यात आली आहे.
संचालक मंडळ निवडणुकीसाठी दि.26 ऑक्टोबर रोजी दुपारी 3 वाजेपर्यंत अर्ज मागे घेण्याची अंतिम मुदत आहे. त्यानंतरच निवडणुकीचे चित्र अधिक स्पष्ट होणार आहे. प्राथमिक शिक्षक समिती, कास्ट्राईब शिक्षक संघटना, शिक्षक सेना या महायुतीतर्फे संचालक मंडळाची निवडणूक लढविली जात आहे.