संगमेश्वर लोवले येथे ट्रकला अपघात, चालक जखमी

संगमेश्वर:- संगमेश्वरहून देवरूखच्या दिशेने जाणाऱ्या ट्रकला अपघात होऊन चालक जखमी झाल्याची घटना काल सोमवार 13 मार्च रोजी दुपारच्या सुमारास घडली.

एका अवघड वळणावर ट्रक चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने ट्रक पलटी झाला. ट्रकची चाके विरूद्ध दिशेला फिरली होती. अपघाताची माहिती मिळताच संगमेश्वर पोलीस घटनास्थळी दाखल झाले.