संगमेश्वर तुरळ येथे बर्निंग कारचा थरार

संगमेश्वर:- मुंबई – गोवा महामार्गावर धावत्या कारने पेट घेतल्याने एकच खळबळ उडाली. ही घटना  संगमेश्वर तुरळ शिंदे आंबेरी येथे रविवारी सायंकाळी 5.45 वाजण्याच्या सुमारास घडली.

 अभय नारायण अंतरकर व त्यांची पत्नी (चिपळूण) हे आपल्या ताब्यातील क्विड गाडी घेऊन चिपळूण ते रत्नागिरी असे सायंकाळी 5.54 च्या दरम्याने जात असताना गाडीने अचानक पेट घेतला. गाडीने पेट घेतल्याचे लक्षात येताच दोघही गाडीतून उतरून बाजूला गेल्याने जीवितहानी टळली. संगमेश्वर पोलीस स्थानकाचे पोलीस सचिन कमेरकर यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी ग्रामस्थांच्या मदतीने गाडीला लागलेली आग आटोक्यात आणली.