रत्नागिरी:- मूचरी ता.संगमेश्वर येथे शनिवारी मुचरी ते घोटलवाडी या रस्त्याचे बाजूस बिबट्या मृत अवस्थेत पडला असल्याचे स्थानिक ग्रामस्थ श्री.सुर्वे व पोलिस पाटील यांनी कळविले नुसार मा.परिक्षेत्र वन अधिकारी यांनी त्यांचे अधिनस्त कर्मचारी यांचे समवेत घटनास्थळी समक्ष पाहणी केली.
त्यावेळी सदर बिबट्या मृत अवस्थेत पडला असल्याचे दिसून आले व ती मादी आहे, सदर बिबट्याचा मृत्यू 4 दिवसा पूर्वी झाला असावा सदर बिबट्याचे अंदाजे वय वर्षे 2ते 3 असून सदर बिबट्याचा मृत्यू अज्ञात वाहनाचे धडकेत झाला असावा असे दिसत आसून शरीरावर आळ्या पडल्या असून त्याची सहाय्यक पशुधन आयुक्त देवरूख यांचे कडून तपासणी करून घेण्यात आली.
त्यानंतर विभागीय वनअधिकारी श्री.दीपक खाडे सहाय्यक वनसंरक्षक श्री.सचिन निलख यांचे मार्गदर्शन खाली अधिक तपास परिक्षेत्र वनअधिकारी रत्नागिरी श्री.प्रकाश सुतार करत असून सदर वेळी परिमंडळ वनअधिकारी देवरूख श्री.मुल्ला , वनपाल पाली श्री गावडे वनरक्षक सर्वश्री पाटील, कडूकर,माळी साबने व ग्रामस्थ उपस्थित होते.
अशा प्रकारच्या वन्यजीव अडचणी आढळून आलेस 1926 या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन वनविभागाच्या वतीने करण्यात येत आहे.