शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त विविध कार्यक्रम
देवरुख:- शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख व कार्याध्यक्ष तसेच माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्ताने संगमेश्वर व चिपळूण विधानसभा मतदारसंघातील शासकीय रुग्णालयांमध्ये सुमारे सातशे ब्लॅंकेटचे वाटप संगमेश्वर चिपळूण विधानसभा संपर्कप्रमुख तथा उद्योजक सुरेश कदम यांच्या वतीने वाटण्यात आले.
उद्योजक श्री. कदम हे गेली अनेक वर्ष तालुक्यामध्ये सामाजिक बांधिलकी जोपासत अनेक समाज उपयोगी उपक्रम राबवत आहेत. तरुणांनी शेती तसेच उद्योग या क्षेत्रामध्ये नाविन्यपूर्ण उपक्रम राबवावेत यासाठी ते नेहमीच कटिबद्ध असतात. गेल्या दीड वर्षापासून त्यांच्यावर संगमेश्वर चिपळूण विधानसभा संपर्क प्रमुख पदाची जबाबदारी स्वीकारली आहे. गुरुवारी पक्षप्रमुखांच्या वाढदिवसानिमित्त अनेक ठिकाणी उद्योजक श्री. कदम यांच्या माध्यमातून आणि खासदार विनायक राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली ब्लॅंकेट वाटपाचा आज हा कार्यक्रम घेण्यात आला.
याचा शुभारंभ देवरुख सोळजाई मंदिर येथे करण्यात आला त्यानंतर देवरुख ग्रामीण रुग्णालय संगमेश्वर ग्रामीण रुग्णालया तो तसेच चिपळूण येथे शासकीय रुग्णालयांमध्ये सुमारे ७०० ब्लॅंकेट वाटण्यात आले. देवरुख येथील ब्लॅंकेट वाटपाच्या कार्यक्रमाप्रसंगी उद्योजक सुरेश कदम, जिल्हाप्रमुख विलास चाळके, रत्नागिरी सिंधुदुर्ग महिला संपर्क प्रमुख नेहा माने, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष रोहन बने, मुंबईतील संगमेश्वर तालुका संपर्क प्रमुख राजेश शेलार, विनोद झगडे, चिपळूण तालुका संपर्क प्रमुख शांताराम चव्हाण, सचिव प्रकाश दुदम, सहसंपर्क प्रमुख स्वप्नील सुर्वे, रत्नागिरी जिल्हा संघटक वेदा फडके, देवरुख सोसायटीचे चेअरमन संतोष लाड, माजी सभापती नंदादीप बोरकर, माजी उपसभापती अजित ऊर्फ छोट्या गवाणकर, माजी नगरसेवक वैभव पवार, विकास जागुष्टे, श्रीम.खेडेकर, तेजस शिंदे, इस्तियाक कापडी, बबन बोदले आदी अनेक शिवसैनिक उपस्थित होते
पक्षप्रमुख, आदरणीय, उद्धव ठाकरेंना उदंड आयुष्य लाभो, व शिवसेनेवरील आलेले संकट दूर करून, पुन्हा महाराष्ट्र मध्ये, शिवशाहीचे सरकार येऊन, उद्धवजी मुख्यमंत्री व्हावेत. असं सोळजाई देवीला गाराण घालण्यात आलं.