रत्नागिरी:- जिल्ह्यात पावसाने हजेरी लावल्याने बळी राजा शेतीच्या कामाला लागला आहे. शेतकर्यांना वेळेत खतपुरवठा जि. प. कृषी विभाग सज्ज झाला आहे. आतापर्यंत मंजूर सुमारे 12 हजार मे.टन खतपुरवठ्यापैकी 6 हजार 300 मे.टन खत शासनाकडून उपलब्ध झाले आहे. त्याचा पुरवठा तालुकास्तरावर केला जात आहे.
रत्नागिरी जिल्ह्यातील एकूण खरीप पिकाखालील क्षेत्र सुमारे 81995 हेक्टर इतके आहे. खरीप भातपिकाखालील क्षेत्र सुमारे-70572 हेक्टर, नागली क्षेत्र सुमारे 10236 हेक्टर एवढे क्षेत्र आहे. या वर्षी 2023-24 च्या खरीप हंगामासाठी 21 हजार मे.टन इतकी खताची मागणी करण्यात आली. त्यापैकी सुमारे 12 हजार मे.टन खत मंजुर करण्यात आले आहे.
खरीप काळात जिल्ह्यातील शेतकऱयांना वेळेत खत पुरवठा होण्यासाठी जिल्हा कृषी विभागाकडून खबरदारी घेण्यात आली असल्याचे जि.प.कृषी अधिकारी अजय शेंडे यांनी सांगितले.
प्रत्येक वर्षी खरीप हंगामाच्या तोंडावर खतांच्या टंचाईला शेतकऱयांना सामोरे जावे लागते. खरिपात निर्माण होणारी खतांची समस्या रोखण्यासाठी कृषी विभागाने लक्ष वेधले आहे.
युरिया व डीएपीचा बफर स्टॉक करण्यावर भर दिला आहे. खतांची कमतरता खरोखरच भासू लागल्यास हा बफर स्टॉक खुला केला जाणार असल्याचे सांगण्यात आले. त्यासाठी या खरीपासाठी 290 मे.टन खताचा बफर स्टॉक ठेवण्याचे नियोजन यापूर्वीच केलेले आहे.
जिह्यात 65 हजार हेक्टर पेक्षा जास्त क्षेत्रावर भात तर अन्य पिकांसाठी सुमारे 14 हजार हेक्टरवर क्षेत्रावर लागवड होते.
या शेतीच्या कामांत शेतकर्यांना खताचा तुठवडा भासू नये यासाठी तयारी सुरू झालेली आहे. गावपातळीवर सोसायट्यांमार्पत खतपुरवठा शेतकर्यांपर्यंत करण्यासाठी कृषी विभागाकडून लक्ष वेधण्यात आले आहे.
खत गुणवत्ता व योग्य वितरण होण्याच्या दृष्टीने जिह्यातील शेतकर्यांना कृषी निविष्ठा विकेत्याकडून विक्री होणाऱया बियाणे, खते, कीटकनाशके इत्यादी निविष्ठांचा दर्जा निकृष्ट असणे, त्यात भेसळ असणे अथवा बोगस असणे, निविष्ठांची अनधिकृत साठवणूक करून कृत्रिम टंचाई निर्माण करणे इत्यादी बाबींवर नियंत्रण ठेवण्यासाठी आपल्या तालुक्याच्या कार्यक्षेत्रामध्ये खालीलप्रमाणे भरारी पथकाची स्थापना करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहे. तसेच जिल्हास्तरावरही तकार निवारण समितीची स्थापना करण्यात आली आहे.