शिवाजी स्टेडियम येथे मद्य प्राशन करणाऱ्या तरुणाविरुद्ध गुन्हा

रत्नागिरी:- शहरातील शिवाजी स्टेडियमच्या मागील गेटच्या बाजूला सार्वजनिक ठिकाणी मद्य प्राशन करणाऱ्या तरुणाविरुद्ध शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विश्वदिप विजय सावंत (२२, रा. किर यांच्याकडे भाड्याने विश्वनगर, रत्नागिरी) असे संशयित तरुणाचे नाव आहे. ही घटना बुधवारी (ता. १५) सायंकाळी साडेपाचच्या सुमारास निदर्शनास आली.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार संशयित स्टेडियमच्या मागील बाजूच्या गेटजवळ मद्य प्राशन करत असताना आढळला. या प्रकरणी पोलिस हेड कॉन्स्टेबल आशिष भालेकर यांनी शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली. तक्रारीवरुन पोलिसांनी संशयिताविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.