शिवाजीनगर येथे वेश्याव्यवसाय चालवणार्‍या संशयिताच्या पोलीस कोठडीत वाढ

रत्नागिरी:- शहरातील शिवाजीनगर या मध्यवर्ती आणि उच्चभ्रू ठिकाणी दोन तरुणींच्या सहाय्याने वेश्याव्यवसाय चालवणार्‍या संशयिताच्या पोलिस कोठडीत सोमवारी 1 दिवसाची वाढ करण्यात आली. त्याला गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने गुरुवार 20 जुलै रोजी दुपारी 2.20 वा. अटक केली होती.

राजेंद्र रमाकांत चव्हाण (45,रा.मिरजोळे जांभूळफाटा,रत्नागिरी) असे पोलिस कोठडीत वाढ करण्यात आलेल्या आलेल्या संशयिताचे नाव आहे.शुक्रवारी त्याला न्यायालयाने सोमवार पर्यंत पोलिस कोठडी सुनावलीा होती.सोमवारी पोलिस कोठडीची मुदत संपल्याने त्याला पुन्हा न्यायालयात हजर करण्यात आले असता त्याच्या पोलिस कोठडीत वाढ करण्यात आली. याप्रकरणात राजेंद्र चव्हाणच्या अन्य साथिदारांचा तसेच याठिकाणी येणार्‍या शौकिंनाच्या मुळाशी जाण्यासाठी शहर पोलिसांकडून त्याठिकाणच्या सीसीटिव्ही फूटेजी पडताळणी करण्यात येणार आहे.