रत्नागिरी:- शहरातील शिवाजीनगर येथे गुरुवारी सकाळी दोन कारना धडक देत अपघात केल्याप्रकरणातील कार चालकाविरोधात शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दिपक आनंद जाधव (44, रा.श्रीतीज अपार्टमेंट मांडवी, रत्नागिरी) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या चालकाचे नाव आहे.त्याच्याविरोधात किरण शांताराम शिंदे (46, मुळ रा.निवे बुद्रुक संगमेश्वर सध्या रा.मिरजोळे,रत्नागिरी) यांनी शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानूसार, गुरुवारी सकाळी दिपक जाधव आपल्या ताब्यातील होंडा अमेज (एमएच- 08- एजी-2183) घेउन साळवी स्टॉप ते रत्नागिरी असा येत होता. तो शिवाजी नगर येथे आला असता त्याने प्रथम ओमनी (एमएच-08-आर-0185) ला पाठीमागून आणि त्यानंतर टोयोटा इटिऑस (एमएच-08 -एजी-0360) या गाडीला धडक देत अपघात केला.यात दोन्ही वाहनांचे मोठे नुकसान झालेले आहे.याप्रकरणी शहर पोलिस ठाण्यात गुरुवारी सायंकाळी उशिरा गुन्हा दाखल करण्यात आलेला असून अधिक तपास शहर पोलिस करत आहेत.