शिवसेना संपर्कप्रमुख सुधीर मोरे यांचे निधन

रत्नागिरी:- जिल्ह्याचे शिवसेना(ठाकरे गट) संपर्कप्रमुख सुधीर मोरे यांचे निधन झाले आहे. घाटकोपर स्टेशनच्या रूळांवर त्यांचा मृतदेह आढळला आहे. प्राथमिक माहितीनुसार, गुरुवारी मध्यरात्रीच्या सुमारास सुधीर मोरे यांचा मृतदेह छिन्नविछिन्न अवस्थेत रेल्वे ट्रॅकवर मिळाला. त्यांच्या मृत्यूचे नेमके कारण अद्याप समोर आलेले नाही.

सुधीर मोरे गुरूवार 31 ऑगस्टच्या रात्री आपल्या खासगी अंगरक्षकांना बैठकीला जायचे आहे, असे सांगून बाहेर पडले. त्यामुळे त्यांच्यासोबत कुणीच नव्हते. त्यानंतर मध्यरात्रीच्या सुमारास घाटकोपर स्टेशनच्या फास्ट ट्रॅकवर त्यांचा मृतदेह आढळला आहे. आज दुपारी सुधीर मोरे यांच्या निवासस्थानावरून त्यांची अंत्ययात्रा निघणार आहे.