रत्नागिरी:- रत्नागिरी शहराजिनकच्या शिरगांव येथील घरातून सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम दम्पत्याने लांबवले. याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून ही घटना 21 फेब्रुवारी ते 3 मार्च 2023 या कालावधीत घडली आहे.
गौतम पवार आणि स्मिता पवार (दोन्ही मूळ रा.किणी वठार हातकणंगले, कोल्हापूर सध्या रा. रत्नागिरी ) अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या पती पत्नीची नावे आहेत. त्यांच्या विरोधात गजानन एकनाथ मयेकर (55,रा.शिरगांव पेट्रोल पंपाजवळ, रत्नागिरी ) यांनी रविवार 19 मार्च रोजी शहर पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यानुसार,संशयित दम्पत्याने मयेकर यांच्या पत्नीच्या रूममधील लोखंडी कपाटातून रोख रक्कम आणि सोन्याचे दागिने लांबवले. याप्रकरणी अधिक तपास शहर पोलीस करत आहेत.