रत्नागिरी:- जिल्ह्यातील मानधन तत्त्वावर काम करणाऱ्या शिक्षकांचा मेळावा रविवारी रत्नागिरी येथे महाराष्ट्र राज्य शिक्षक सेना या संघटनेच्या माध्यमातून राज्याचे उद्योग मंत्री रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री ना.उदयजी सामंत यांच्या उपस्थितीत पार पडला. ज्यावेळी जिल्ह्यातील शेकडो शिक्षकांनी या कार्यक्रमाला हजेरी लावली होती. रत्नागिरीतील माळनाका येथील मराठा भवन येथे हा मेळावा सपन्न झाला.
या मेळाव्याला मानधन तत्वावर काम करणाऱ्या नवीन शिक्षकांनी गर्दी केली होती. यावेळी पालकमंत्री ना. उदयजी सामंत यांनी यांच्या अडीअडचणी जाणून घेत त्यांना मार्गदर्शन केले. जितके दिवस मानधन तत्वावर काम कराल त्या शिक्षकांना नियमित मानधन देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचा शब्द पालकमंत्री ना. उदयजी सामंत यांनी दिला. शिक्षकांना ९ हजार रुपये मानधन देणारा महाराष्ट्रा मधील रत्नागिरी हा एकमेव जिल्हा असल्याचे त्यांनी सांगितलेm
जिल्ह्यातील शिक्षकांना न्याय देण्यासाठी तुमचा पालक मंत्री म्हणून मी कटिबद्ध असल्याचा शब्द पालकमंत्री ना. उदयजी सामंत यांनी दिला. नव्याने होणारे शिक्षक भरती प्रक्रियेची कार्यशाळा रत्नागिरी घेणार स्थानिक शिक्षकांनी याच्यामध्ये आपल्या ज्ञानात भर पाडण्यासाठी कार्यशाळाला उपस्थित राहण्याचे अहवान केले. जिल्ह्यात काही शिक्षकाचा पेहराव घालून राजकारण करणाऱ्या शिक्षकांना पालकमंत्री यांनी खडे बोल सुनावले असून ते म्हणाले मी प्रेमाने राजकारण करतो,मी पायाने गाठ मारली तर तुम्ही हाताने सोडू शकत नाही.शिक्षकांच्या भूमिकेत राहून राजकारण करण्यापेक्षा ज्ञानदान करा असा सल्ला ही पालकमंत्री ना. उदयजी सामंत यांनी दिला.या कार्यक्रमाला उपजिल्हा प्रमुख राजन शेट्ये, तालुका प्रमुख बाबू म्हाप, शिक्षक सेनेचे जिल्हाध्यक्ष दिलीप देवळेकर, सौं. सकपाळ, श्री. मोहिते, दीपक कदम, सुदिन चव्हाण, मेघनाथ गोसावी, प्रवीण देसाई यांच्या सहित हजारो शिक्षक, पदाधिकारी उपस्थित होते.