रत्नागिरी:- लोककला हा राज्याच्या सांस्कृतिक संपत्तीचा अमुल्य असा ठेवा म्हटले जाते. या कला जपणारा खरा कलाकार जगला तर कला जिवंत राहील. येथील नमन लोककला कोणतेही आर्थिक पाठबळ नसताना फार पूर्वीपासून येथील ग्रामीण भागातील कलावंतांनी जिवापाड जपलीय. अशा या लोककलेतील रत्नागिरी तालुक्यातील 32 ज्येष्ठ कलावंतांना शासनाच्या कलावंत मानधन योजनेचा लाभ मिळवून देण्यात आलाय. त्या सर्व कलावंतांचा नुकताच कोकण नमन कलामंच रत्नागिरीतर्फे सत्कार करण्यात आला.
नमन या लोककलेशी जोडलेल्या ज्येष्ठ कलावंतांना शासनाच्या कलावंत मानधन योजनेचा लाभ मिळवून देण्यासाठी कोकण नमन कलामंच सदैव तत्पर झालेला आहे. शासनाच्या मानधन योजनेचा या कलावंताना लाभ मिळवून देण्यासाठी, त्याविषयी जनजागृती करून आज अनेक ज्येष्ठ कलावंतांचे पस्ताव सादर करण्यात येत आहेत. या नमन कलावंतांना शासनाच्या माध्यमातून भरीव मदत मिळावी यासाठी राज्याचे उद्योगमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांचा मोलाचा वाटा आहे. कोविड काळात तर आर्थिक संकटात सापडलेल्या जिल्ह्यातील सर्व नमन मंडळ, त्यातील कलावंत यांना आर्थिक सहाय्य शासनाच्या माध्यमातून मिळवून दिले होते. त्यानंतर आता या जेष्ठ कलावंतांना मानधन (पेन्शन) मिळवून देण्यात महत्वाची भूमिका घेतलेली असल्याचे अध्यक्ष प्रभाकर (पी.टी.) कांबळे यानी आवर्जून सांगितले.
कोकण नमन कलामंच, रत्नागिरी यांच्यावतीने पानवल होरंबेवाडी येथील सभागृहात सत्कार करण्यात आला. या कार्यकमाला कोकण नमन कलामंच रत्नागिरीचे संस्थापक श्रीधर खापरे, रत्नागिरी पंचायत समितीचे गटविकास अधिकारी जे.पी.जाधव, जिल्हा अध्यक्ष पभाकर (पी.टी.) कांबळे, उपाध्यक्ष अरुण कळंबटे, सचिव-विश्वनाथ गावडे, सहसचिव-सुरेश होरंबे, खजिनदार-सुरेश येजरे, जिल्हा सदस्य सचिन काष्टे (संगमेश्वर), विश्वास दसम, पानवल गावचे गावकर गणपत होरंबरे, शंकर होरंबे, तसेच कोकण नमन कलामंचचे श्रीकांत बोंबले, वृध्द कलाकार मानधन जिल्हा समिती सदस्य हरिश्चंद्र बंडबे आदीं मान्यवरांची पमुख उपस्थिती होती.
त्यावेळी आपल्या मनोगतात संस्थेचे जिल्हाध्यक्ष पभाकर (पी.टी.) कांबळे यांनी
पन्नास वर्षापेक्षा अधिक वय असलेला कलावंतांना शासनाच्या पेन्शन योजनेच्या लाभासाठी महत्वाच्या सूचना केल्या आहेत. कलावंतांना कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न मर्यादा 48000 इतकी आहे ती मर्यादा 1 लाखापर्यंत केली जावी. जे मानधन अ, ब, क श्रेणीनुसार दिले जाते, त्यात वाढ करून किमान 5 ते 10 हजार रु. इतकी वाढ केली जावी. त्याचपमाणे दरवषीं जिल्ह्यातून 100 लोककलावंतांचे पस्ताव मंजूर करण्याचे उद्दीष्ट आहे, ते 500 पर्यंत केले जावे अशा मागण्या उपस्थित अधिकारी व जिल्हा समिती सदस्यांसमोर व्यक्त केल्या आहेत. पेन्शन योजनेचा लाभ मिळवून देण्यात मोलाचा वाटा उचणाऱया अध्यक्ष पभाकर (पी.टी.) कांबळे यांचा उपस्थित वृध्द कलाकारांकडून सत्कार करण्यात आला.
यावेळी जिल्हा परिक्षक म्हणून महेंद्र कांबळे, ज्येष्ठ कलाकार शांताराम होरंबे, सदस्य पविण कळंबटे, अमित डांगे, मनोज घवाळी, विकास गिजबिले हे देखील उपस्थित होते. कार्यकमाचे सुत्रसंचालन विश्वनाथ गावडे, पस्तावना उपाध्यक्ष अरुण कळंबटे, तर कलाकार मानधन योजनेचे महत्व बीडीओ जे.पी.जाधव यावर मार्गदर्शन केले. या कार्यकमात विशेष सत्कारात नमन लोककलेला सातासमुद्रापार पोहचविणारे शहरातील राजीवडा येथील शेख अहमद महमंद हुश्ये, तसेच कलाकार रमाकांत तानाजी घाणेकर, गौरव बंडबे यांचा करण्यात आला. सन 2023 मध्ये 10 पेक्षा जास्त नमन कार्यकम करणाऱया मंडळांमध्ये रवळनाथ रिमिक्स नमन मंडळ लयभारी, रत्नागिरी तसेच नवलाई मित्र नमनमंडळ निवळी, श्री ग्रामदेवता लोककला नाट्यनमन मंडळ-माभळे जाधववाडी, संगमेश्वर यांनाही सन्मानित करण्यात आले.