ना. सामंत; पहिल्या टप्प्यात साडेबारा कोटी
रत्नागिरी:- सेंटर ऑफ एक्सलंट (एमएसडीपी) अंतर्गत रत्नागिरी शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालय अद्ययावत केले जाणार आहे. महाराष्ट्रात दिमागदार कॅम्पस म्हणून त्याची ओळख होईल. त्यासाठी 25 कोटीचा निधी दिली जाणार असून पहिल्या टप्प्यात साडे बारा कोटी दिले जातीत. पुढच्या वर्षीपासून सुरू होणार्या इंजिनिअरिंग कॉलेजची ही नांदी असेल, अशी माहिती उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी दिली.
शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत बोल होते. यावेळी नगराध्यक्ष बंड्या साळवी, जिल्हा परिषदेचे आरोग्य व बांधकाम सभापती बाबू म्हाप आदी पदाधिकारी, प्राध्यापक उपस्थित होते. तंत्रनिकेतन कॉलेजच्या नियोजित बांधकामाचे यावेळी प्रेझेंटेशन झाले. सुमारे 50 ते 60 कोटीचा तो आराखडा आहे. मात्र यामध्ये विद्यार्थ्यांच्या बौद्धिक विकासाबाबत कोणतेच नियोजन नव्हते. तेव्हा उदय सामंत यांनी प्रेझेंटेशन थांबविले. यामध्ये विद्यार्थ्यांच्या बौद्धिक विकासाचे काहीच नियोजन नाही, असे प्रश्न केला. विद्यार्थ्यांच्या अपग्रेडेशनला आदी प्राधान्य द्या. त्यानंतर या इमारती उभा करुया, असे त्यांनी स्पष्ट केले.
ते म्हणाले, शासकीय तंत्रनिकेतनचा कॅम्पस विकसित करण्याच्यादृष्टीने आमचा प्रयत्न आहे. अद्ययावत आणि आकर्षक आशा इमारीत उभारल्या जाणार आहेत. त्यासाठी सुमारे 25 कोटी रुपये देण्यात येतील. सेंटर ऑफ एक्सलंट या योजनेतून हा विकास होईल. पहिल्या टप्प्यात साडे बारा कोटी दुसर्या टप्प्यात साडे बारा कोटी दिले जातील. मात्र यामध्ये विद्याथ्यांच्या बौधिक विकासावर माझा जास्त भर आहे. सध्या तीनच कोर्सेस सुरू आहेत. ते वाढविण्याचा प्रयत्न आहे. मरिन, पर्यटन, बीच शॅक आदी रोजगार निर्मितीच्यादृष्टीने हे प्रयत्न आहेत. पुढच्या वर्षी येथे इंजिनिअरिंग कॉलेज सुरू करण्याच्यादृष्टीने हे पहिले पाऊल आहे. महाराष्ट्रात दिमगादार असा रत्नागिरी शासकीय तंत्रनिकेतनचा हा कॅम्पस असले. कर्मचारी वसाहतीच्या इमारती देखील सुसज्ज केल्या जाणार आहे. शासकीय तंत्रनिकेमध्ये यंदा चांगला प्रतिसाद मिळत आहे. 1014 विद्यार्थ्यांनी प्रवेशासाठी नोंदणी केली आहे.