रत्नागिरी:- मागील काही दिवसांपासून शहर आणि परिसरात कोरोनाचा फैलाव वाढलेला दिसून येत आहे. मंगळवारी रात्री आलेल्या अहवालानुसार तालुक्यात नव्याने 29 पॉझिटिव्ह रुग्ण सापडले आहेत. पॉझिटिव्ह रुग्ण सापडण्याचा आकडा कमी असला तरी निश्चित चिंता वाढवणारा आहे.
मागील काही दिवसांपासून तालुक्यात कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण सापडण्याचे प्रमाण वाढत आहे. इतर तालुक्यांच्या प्रमाणात रत्नागिरी तालुक्यात रुग्ण सापडण्याचे प्रमाण तुलनेने अधिक आहे. तालुक्यात आता पर्यंत 1 हजार 399 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण सापडले आहेत. यापैकी 391 ऍक्टिव्ह पॉझिटिव्ह रुग्ण असून 43 जणांचा मृत्यू झाला आहे.
मंगळवारी आलेल्या अहवालानुसार 29 रुग्ण पॉझिटिव्ह आले आहेत. यात कुवारबाव परिसरात पुन्हा चार रुग्ण सापडले आहेत. याशिवाय सन्मित्र नगर 1, टिळक आळी 1, झरेवाडी 1, कारवांची वाडी 2, पोलीस लाईन 1, तेली आळी 1, सिविल ऍडमिट 1, शांती नगर 1, पारस नगर 1, खंडाळा जयगड 1, हातखंबा 1, गोडाऊन स्टॉप 1, जोशी पाळंद 1, लांजा 2, पोलीस मुख्यालय 1, सहकार नगर नाचणे 2, जयगड 1, पावस 1, संगमेश्वर 1, आंबेड खुर्द संगमेश्वर 1, आदमपूर डेपो रत्नागिरी 1 आणि बने वाडी 1 असे रुग्ण सापडले आहेत.