रत्नागिरी: शहातील खालचा फगरवठार येथून ३३ वर्षीय विविहिता बेपत्ता झाल्याने शहरात खळ्बळ उडाली आह. दि. २९ सप्टेंबर रोजी सौ.तन्वी रितेश घाणेकर ह्या बाजारात दुचाकी वरुन गेल्या होत्या. मात्र त्या अद्याप घरी न परतल्याने पती रितेश घाणेकर यांनी त्या बेपत्ता झाल्याची तक्रार शहर पोलीस स्थानकात दाखल केली आहे.
रितेश घाणेकर यांनी दिलेल्या तक्रारीनुसार त्यांची पत्नी सौ.तन्वी घाणेकर (३३) हा दि. २९ सप्टेंबर रोजी रात्री ७.१५ वाजण्याच्या सुमारास त्यांची मुलगी आनंदी हिला, मी बाजारात जावून येते. उशिर झाला तर जेवण करुन घ्या असे सांगून आपल्या दुचाकी (क्र.एमएच ०८ एक्स ७११६) वरुन बाजारात गेल्या होत्या. त्या त्यादिवशी रात्री घरी परतल्या नाहीत. दुसर्या दिवशी दुपारपर्यंत त्या घरी न आल्याने पती रितेश यांनी दि.३० सप्टेंबरला शहर पोलीस स्थानकात तक्रार दाखल केली आहे. या महिलेची दुचाकी भगवती बंदर परिसरात सापडली आहे आणि मोबाईल लोकेशन रत्नागिरी शहर परिसराच्या बाहेर सापडले आहे. चार दिवस उलटल्यानंतरही त्यांच्या शोध न लागल्याने नातेवाईक चिंतेत आहे.अधिक तपास शहर पोलीस करत आहेत.