रत्नागिरी:- ऐन पाणी टंचाईच्या कालावधीत रत्नागिरी शहरातील प्रभाग क्रमांक ५ आणि ६ मधील नागरिकांसाठी उद्योजक सौरभ मलुष्टे यांनी मोफत पाणी सेवा देण्यासाठी पुढाकार घेतला आहे. या दिवशी या दोन प्रभागामध्ये पाणी पुरवठा होणार नाही त्या दिवशी सौरभ मलुष्टे स्वखर्चाने या भागातील नागरिकांसाठी छोट्या टँकरने पाणी सेवा करणार आहेत.
सौरभ मलुष्टे नेहमीच सामाजिक कार्यात अग्रेसर असतात. गतवर्षी वडिलांच्या स्मरणार्थ त्यांनी साळवी स्टॉप येथे फिल्टर पाण्याची पाणपोई सुरु केली. साळवी स्टॉप हा रहदारीचा भाग आहे. या ठिकाणी पाण्याची असलेली आवश्यकता लक्षात घेऊन ही पाणपोई सुरू करण्यात आली. अनेक ज्येष्ठ नागरिक,कामगार,पर्यटक,ऑफिसर लोक,डिलिव्हरी बॉय,महिला,रुग्णांनाचे नातेवाईक,विद्यार्थी आशा अनेक नागरिकांना या पाणपोई चा फायदा झाला.
सध्या रत्नागिरीत उकाडा प्रचंड वाढला आहे. वाढत्या उष्म्या सोबत पाणी टंचाई देखील तीव्र होत आहे. पाऊस पडेपर्यंत पाणी उपलब्ध व्हावे यासाठी रनपने शहरात एक दिवस आड पाणी पुरवठा सुरू केला आहे. शहरातील विहिरींचे पाणी देखील आठल्याने नंबर लावून देखील चार – चार दिवस टँकर उपलब्ध होत नाहीत अशी परिस्थिती असताना उद्योजक सौरभ मलुष्टे शहरातील प्रभाग क्रमांक पाच आणि सहा मध्ये मोफत पाणी सेवा देणार आहेत. ज्या दिवशी या प्राभागा मध्ये पाणी येणार नाही त्या दिवशी छोट्या टँकरने विनामूल्य पाणी पुरवठा करण्यात येणार आहे. अपुऱ्या यंत्रणे अभावी ही सेवा केवळ दोन प्रभगापुरती मर्यादित ठेवण्यात येणार आहे. या सेवेत सौरभ यांची उद्योजक दिनेश जठार यांची साथ लाभली आहे. पाऊस पडेपर्यंत ही मोफत पाणी सेवा सुरू ठेवण्यात येईल असे मलुष्टे यांनी सांगितले. मात्र
टँकरचे पाणी हे विहिरीचे अथवा बोअरचे पाणी असल्याने आपण फिल्टर करूनच पाणी पिण्यास वापरावे असे आवाहन मलुष्टे यांनी केले आहे.