शरद धामापुरकर यांचा सेवानिवृत्तीपर विशेष सन्मान

रत्नागिरी:- चाळीस वर्षांच्या प्रदीर्घ सेवेनंतर सेवानिवृत्त झालेले शरद धामापुरकर यांना सन्मानपूर्वक निरोप देण्यात आला. नुकत्याच झालेल्या या निरोप समारंभाला मान्यवर मंडळींनी हजेरी लावली.

शरद धामापुरकर यांनी १९८३ साली सरकारी सेवेचा श्रीगणेशा केला. चिपळूण बांधकाम विभागातून त्यांनी सरकारी सेवा सुरू केली. राजापूर, देवरुख, रत्नागिरी येथे शाखा अभियंता म्हणून त्यांनी काम केले. यानंतर अकोला येथे उप अभियंता म्हणून त्यांनी कार्यभार स्वीकारला. यानंतर चिपळूण आणि नंतर रत्नागिरी प्रधान मंत्री ग्राम सडक विभाग येथे ते २०१८ पासून कार्यरत होते. २८ एप्रिल २०२३ रोजी प्रधान मंत्री ग्राम सडक योजनेच्या रत्नागिरी कार्यालयातून त्यांनी सेवानिवृती स्वीकारली.

त्यांच्या सेवा निवृत्तीचा कार्यक्रम जे के फाइल्स येथील रॉयल बँकवेट येथे नुकताच पार पडला.
शुक्रवारी झालेल्या सेवानिवृत्तीच्या कार्यक्रमाला अनेक मान्यवरांनी हजेरी लावली होती. यावेळी उद्योजक अण्णा सामंत, माजी आमदार बाळ माने यांच्यासह बांधकाम विभागाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.