व्यावसायिकाची  दुकानात गळफास घेऊन आत्महत्या

रत्नागिरी:- चप्पल व्यवसाय व्यवस्थित
चालत नसल्याच्या नैराश्यातून व्यावसायिकाने दुकानातच गळफास घेत आत्महत्या केली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना तालुक्यातील वाटद खंडाळा येथे सोमवार ९ सप्टेंबर रोजी सायंकाळी ६:३० वाजण्याच्या सुमारास उघडकीस आली. अनिल काशिराम खेडेकर (४२, रा. वाटद खंडाळा, रत्नागिरी) असे त्यांचे नाव आहे.

अनिल खेडेकर यांचा वाटद खंडाळा येथे चप्पल विक्रीचा व्यवसाय आहे. मात्र गेला काही काळ तो व्यवस्थित चालत नव्हता. त्यामुळे काही दिवसांपासून ते फार तणावात होते. या नैराश्यातून त्यांनी आपल्या दुकानातच गळफास घेतला. ही बाब त्यांच्या नातेवाईकांच्या निदर्शनास येताच त्यांनी लगेचच त्यांना उपचाराकरता वाटद खंडाळा प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले. मात्र उपचार सुरू करण्याआधीच त्यांची प्राणज्योत मालवली होती. याप्रकरणी जयगड पोलिस स्थानकात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.