रत्नागिरी:- अवेळी पाऊस व गारपिटीमुळे बाधित शेतकर्यांना तीन महिन्यांच्या व्याजमाफीपोटी २ कोटी ७१ लाख ४६ हजार रुपये तर रुपांतरित कर्जावरील ४ कोटी ९८ लाख ८५ हजारांची कर्जावरील व्याजमाफी देण्याचा शासनाने निर्णय घेतला आहे. याचा लाभ जिल्ह्यातील ११ हजार ७८३ आंबा बागायतदारांना मिळणार आहे.
वातावरणातील बदलांमुळे २०१४‚१५ या वर्षात अवेळी पावसाने जिल्ह्यातील आंबा बागायतीचे मोठे नुकसान झाले होते. त्यावेळी पीक कर्जाचे पुनर्गठन करा, अशी मागणी बागायतदारांनी केली. त्याला शासनाने हिरवा कंदील दिला होता. त्यामध्ये शेतकर्यांचे २०१५‚१६ या वर्षाचे संपूर्ण व्याज व पुढील ४ वर्षाचे ६ टक्के दराने होणारे व्याज ४ कोटी ९८ लाख ८५ हजार रुपये रूपांतरित कर्जावरील व्याजमाफी योजनेंतर्गत संबंधित शेतकर्यांना देण्यास विशेष बाब म्हणून सहकार, पणन व वस्त्रोद्योग विभागाने मान्यता दिली आहे. या शासननिर्णयात रुपांतरित कर्जाचा वार्षिक हप्ता विहित मुदतीत परत करण्याची आणि शेतकरी नैसर्गिक आपत्तीने बाधित असण्याची अट शिथिल करण्यात आली आहे.
या संदर्भात जिल्ह्यातील बागायतदारांनी पालकमंत्री ना.उदय सामंत यांच्याकडे मागणी केली होती. त्यानुसार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत फेब्रुवारी व मार्च २०१५ मध्ये अवेळी पाऊस व गारपीटीमुळे शेतजमिनींचे व शेतीपिकांचे नुकसान झालेल्या आपदगÏस्त शेतर्कघ्यांना तीन महिन्यांची व्याजमाफी तसेच २०१४‚१५ या वर्षातील रुपांतरित कर्जावरील २०१५‚१६ या वर्षाचे संपूर्ण व्याज आणि पुढील चार वर्षांचे ६ टक्के दराने होणारे व्याज शासनामार्फत सरसकट देण्याची मागणी करण्यात आली होती. निर्णयाला अनुसरून जिल्हाधिर्काघ्यांनी ८ व ९ नोव्हेंबच्या पत्रान्वये प्रस्ताव सादर केला होता.
अवेळी पाऊस व गारपीटीमुळे शेतजमिनींचे व शेतपिकांचे नुकसान झालेल्या ज्या शेतकर्यांच्या पिकांचे पंचनामे जिल्हाधिकारी, तहसीलदार यांच्या अभिलेखात उपलब्ध आहेत, अशा जिल्ह्यातील आपदग्रस्त ११ हजार ७८३ शेतकर्यांना ३ महिन्यांच्या व्याजमाफीची रक्कम वितरित केली जाणार आहे.