रेगे कंपाऊंडमधील घटना; संशयित पोलिसांच्या टप्प्यात
रत्नागिरी:- शहरातील पोलिस मुख्यालया नजिक रेगे कंपाऊंडमध्ये वॉचमनचा दगडाने ठेचून निर्घृण खून झाल्याचा प्रकार उघडकीस आला
आहे. घटनेची माहिती मिळताच तात्काळ पोलीस यंत्रणा घटनास्थळी दाखल झाले आहे श्याम पथकासह पोलीस त्या बागेमध्ये पुरावा शोधण्याचा दृष्टीने बागेची झेडपी घेत आहेत.
अशोक महादेव वाडेकर ( वय ६०, रा. गणेश रेसिडेन्सी बिल्डिंग, गवळीवाडा) आहे खून झालेल्याचे नाव आहे. ही आज शनिवारी रात्री उघडकीस आली. घटनेची माहिती मिळताच पोलिस अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. हा खून नेमका कोणत्या कारणासाठी झाला याचा शोध पोलिस घेत आहेत.
पोलीस अधीक्षक कार्यालयाकडून गवळीवाडा कडे जाणाऱ्या रोड लगत असणाऱ्या जुन्या रेगे कंपाऊंड मध्ये ही घटना घडली. मृत व्यक्ती ही कंपाउंड समोरील इमारतीमध्ये वॉचमन म्हणून कामाला होती. या इमारती नजीक असते वास्तव्याला होते. रेगे कंपाउंड मधूनच ते आपल्या घराच्या दिशेने जात असत. असे स्थानिक लोकांनी सांगितले. व त्यांचा खून नेमका कोणी व कोणत्या कारणासाठी केला याचा शोध पोलिस घेत आहेत. पोलिसांना संशयिताचा सुगावा लागला असून तो पोलिसांच्या टप्प्यात आहे. लवकरच हे खून प्रकरण उघड होण्याची शक्यता आहे.