वैद्यकीय प्रमाणपत्र देण्यासाठी लाच स्वीकारताना दापोली उपजिल्हा रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी जाळ्यात

रत्नागिरी:- वडिलांचा शस्त्र परवाना नूतनीकरण करण्यासाठी आवश्यक वैद्यकीय प्रमाणपत्र देण्यासाठी लाच स्वीकारताना दापोली उपजिल्हा रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी डॉ. सुरेश कुराडे यांना रंगेहाथ पकडण्यात आले. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी गुरुवारी ही कारवाई केली.

शस्त्र परवाना नूतनीकरण करण्यासाठी आवश्यक वैद्यकीय प्रमाणपत्रासाठी तक्रारदार यांनी दापोली उपजिल्हा रुग्णालयातील डॉ. सुरेश कुराडे यांची भेट घेतली होती.यावेळी डॉ. कुराडे यांनी तक्रारदार यांच्याकडे २० हजार इतक्या लाचेची मागणी केली.
तडजोडी अंती १८ हजारांची लाच रक्कम तक्रारदार यांचेकडून पंचांसमक्ष स्वीकारताना आरोपी लोकसेवक यांना रंगेहात पकडून ताब्यात घेण्यात आले. त्यांचेविरुद्ध कायदेशीर कारवाईची प्रक्रिया हाती घेण्यात आली आहे.
ही कारवाई पर्यवेक्षण अधिकारी सुशांत चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक प्रवीण ताटे, पोहवा विशाल नलावडे, पोना, दीपक आंबेकर व चापोना प्रशांत कांबळे यांनी केली.