रत्नागिरी:- शहरानजिकच्या मिरजोळे एमआयडीसी येथील वेल्डिंग वर्कशॉप मधील ४ हजार २०० रुपयांचे सामान चोरल्याप्रकारणी एका विरोधात शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मजीद कासम नाईक (३१,रा.उद्यमनगर, रत्नागिरी ) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयिताचे नाव आहे. त्याच्याविरोधात मारुती बिरू मानवर (४८,रा.एमआयडीसी, रत्नागिरी ) यांनी तक्रार दिली आहे. त्यानुसार,त्यांचे मिरजोळे एमआयडीसी येथे रत्नसागर मरीन वर्क्स नावाचे वर्कशॉप आहे.७ डिसेंबर रोजी रात्री ९ वा. सुमारास मजीद नाईकने त्यांच्या वर्कशॉप मध्ये प्रवेश करून दीड फुटी पाईप,४ व ५ इंची चॅनेल,लोखंडी बोटीचा इंजिन फौंडेशन, एम. एस प्लेटचे ७ त्रिकोणी तुकडे असे एकूण ४ हजार २०० रुपयांचे सामान चोरून नेले.याप्रकरणी अधिक तपास शहर पोलीस करत आहेत.