वेरॉन कंपनीतील 80 हजारांची केबल लंपास

रत्नागिरी:- शहरानजीकच्या मिरजोळे एमआयडीसी येथील वेरॉन कंपनीमधील तब्बल 80 हजार रुपये किंमतीची केबल अज्ञाताने लांबवली. ही घटना शनिवार 8 मार्च रोजी सायंकाळी 5.30 ते रविवार 9 मार्च रोजी दुपारी 2 वा. कालावधीत घडली आहे. 

याबाबत राजू महिपती सोनावणे (42) यांनी ग्रामीण पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानुसार, वेरॉन अ‍ॅल्युमिनियम प्रा.लि. कंपनी मधील पी.डी.सी डिपार्टमेंटमधील 78 हजार 990 रुपयांची केबल अज्ञाताने चोरुन नेली. याप्रकरणी ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.