वृद्धाच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी दुचाकीस्वारा विरोधात गुन्हा दाखल

खेड:- तालुक्यातील पंधरागाव- धामणंद विभागातील आंबडस- सोलकरवाडी येथील बस स्टाॅपवर रस्ता ओलांडणा-या 75 वर्षीय वृद्ध विठ्ठल बाबू उतेकर याला दुचाकीने धडक दिल्यावर झालेल्या अपघातात वृद्धाच्या मृत्यूस आणि स्वत:च्या दुखापतीस व वाहनाच्या नुकसानीस कारणीभूत ठरल्याप्रकरणी दुचाकीस्वार  प्रविण पांडुरंग कदम (वय 25 रा आकडे जुनागडे वाडी, ता. चिपळूण जि. रत्नागिरी) याचेवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना दि  24 ऑक्टोबर 2022 रोजी सकाळी 9.30 वाजण्याच्या सुमारास आंबडस- सोलकरवाडी बस स्टाॅपवर घडली. 

चिपळूण ते धामणंद मार्गावरील रस्त्यावर आंबडस सोलकरवाडी बस स्टाॅपवर आरोपीत प्रविण पांडुरंग कदम (वय 25) हे आपल्या ताब्यातील दुचाकी ( एमएच 08- झेड- 5393) ही भरघाव वेगाने चालवून वर नमुद वेळी व दिवशी व  नमुद ठिकाणी वयोवृद्ध 75 वर्षीय विठ्ठल बाबू उतेकर हे रस्ता ओलांडत असताना दुचाकीस्वाराचा आपल्या ताब्यातील दुचाकीवरील ताबा सुटून रस्ता ओलांडत असलेले वयोवृद्ध उतेकर यांना जोराची धडक दिल्याने झालेल्या अपघातात वयोवृद्धाचा मृत्यू झाला. अपघातास कारणीभूत, वयोवृद्धाच्या मृत्यूस कारणीभूत, आपल्या सहकारी व स्वत:च्या दुखापतीस कारणीभूत ठरल्याप्रकरणी येथील पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही माहीती पोलीस कंट्रोल रूम कडून प्राप्त झालेल्या एफआरआय वरून मिळाली. या गुन्ह्य़ाचा अधिक तपास पोलीस करीत आहेत.