विहिरीत पडलेल्या सांबराची यशस्वी सुटका 

चिपळूण:- चिपळूण तालुक्यातील सावर्डे मधील मौजे कुटरे बादेकोंड येथे दिपक शिर्के यांच्या घराच्या शेजारील पडक्या विहिरीमध्ये पडलेल्या सांबर प्राण्याची वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी सुखरुपरित्या बाहेर काढुन जीवनदान दिले.

 सावर्डेतील मौजे कुटरे बादेकोंड येथील रहिवासी दिपक शिर्के यांच्या घराच्या शेजारील पडक्या विहिरीमध्ये सांबर पडला आसल्याची माहिती त्यांनी दुरध्वनीव्दारे वन विभागाला दिली. त्यानुसार वन विभागाच्या कर्मऱ्यांनी तात्काळ तेथे जावून त्या सांबर या वन्यप्राण्यास बाहेर काढले. याबचाव कार्यात उमेश आखाडे वनपाल सावर्डे, श्री. गुंठे वनरक्षक नांदगाव यांनी त्याला सांबरास नैसर्गिक अधिवासात मुक्त केले.

सदरचे बचावकार्य विभागीय वन अधिकारी, रत्नागिरी (चिपळूण) व सहाय्यक वनसंरक्षक (प्रा.), रत्नागिरी (चिपळूण) श्री. सचिन निलख यांचे मार्गदर्शनाखाली व श्री. राजश्री चं. कीर परिक्षेत्र वन अधिकारी, चिपळूण, व त्यांचे अधिनस्त कार्यात श्री उमेश आखाडे वनपाल सावर्डे, श्री. गुंठे वनरक्षक नांदगाव यांचे समवेत पूर्ण केले. मानवी वस्तीमध्ये किंवा संकटात सापडलेले वन्यप्राणी आढळल्यास याबाबत तात्काळ माहिती देण्याकरता वनविभागाचा टोल फ्रि क्र. १९२६ या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन वनविभागामार्फत केले गेले आहे.