रत्नागिरी:- अज्ञात कारणातून उंदीर मारण्याचे औषध प्राशन केलेल्या तरुणाचा उपचारादरम्यान जिल्हा शासकिय रुग्णालयात मृत्यू झाला.
जितेंद्र सहदेव पांचाळ (34,रा.गोठणे दोनीवडे, राजापूर) असे उपचारांदरम्यान मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. जितेंद्र हा गेली सात वर्षे मानसिक आजारी होता. रविवार 19 जानेवारी रोजी दुपारी 3.30 वा. सुमारास त्याने घराबाहेर उंदीर व मुंग्या मारण्याचे औषध प्राशन केले. काही वेळाने त्याला अस्वस्थ वाटू लागल्यावर त्याच्या वडिलांनी त्याला ग्रामीण रुग्णालयात दाखल करुन अधिक उपचारांसाठी जिल्हा शासकिय रुग्णालयात दाखल केले होते. त्याच्यावर उपचार सुरु असताना सोमवार 20 जानेवारी रोजी पहाटे 4 वा. सुमारास उपचारांदरम्यान जितेंद्रचा मृत्यू झाला.