रत्नागिरी:- शिळ (ता. राजापूर) येथील विवाहितेने विषारी औषध प्राशन केले. अधिक उपचारासाठी तिला जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले होते. उपचार दरम्यान तिचा मृत्यू झाला. साक्षी संकेत बाईत (वय 32, रा. बाईतवाडी, शिळ, रत्नागिरी) असे मृत विवाहितेचे नाव आहे. ही घटना मंगळवारी (ता. 10) दुपारी सव्वा तीनच्या सुमारास जिल्हा शासकीय रुग्णालयात घडली.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, साक्षी बाईत यांनी कोणत्यातरी अज्ञात कारणावरुन 1 ऑक्टोबरला रात्री दहाच्या सुमारास विषारी औषध प्राशन केले. तत्काळ नातेवाईकांनी उपचारासाठी राजापूर ग्रामीण रुग्णालयात दाखल केले होते. अधिक उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात तिच्यावर उपचार सुरु होते. मंगळवारी तिचा उपचार दरम्यान मृत्यू झाला. रुग्णालयाच्या पोलिस चौकीत आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.