खेड:- खेडमध्ये विवाहितेला आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याचा गुन्हा असलेल्या विवाहितेचा पती व सासूला जामीन मंजूर करण्यात आला आहे.
विवाहितेचा पती व कुटुंबियानी तीचा छळ केल्यामुळे तिने आत्महत्या केली अशी तक्रार तिच्या भावजयने पोलिसांत केली होती. या प्रकरणी खेड पोलिसांनी भारतीय दंड विधान कलम 108 अन्वये गुन्हा दाखल करत विवाहितेचा पती, सासू तसेच कुटुंबीयांनी आत्महत्येला प्रवृत्त केल्याप्रकरणीया गुन्हा दाखल केला होता. कामी संशयितांतर्फे अॅडवोकेट सुधीर शरद बुटाला यांनी खेड न्यायालय येथे जामीन मिळण्यासाठी अर्ज दाखल केला होता. अॅडवोकेट सुधीर शरद बुटाला यांनी युक्तिवाद करून उच्च न्यायालयाचे दाखले देखील दिले. या तक्रारीत फिर्यादी हिने शंका व्यक्त केली होती की संशयित याने खून केला आहे, तसेच संशयिताने खोटे सांगितले की तिला हृदयविकाराचा झटका आला आहे. या बाबतीत अडवोकेट सुधीर बुटाला यांनी युक्तिवाद करत अशाप्रकारे आरोप फिर्यादी करू शकत नाही. असा युक्तिवाद केला. जिल्हा न्यायाधीश यांनी सदर युक्तिवाद व दोन्ही पक्षांचा युक्तिवाद ऐकून संशयित पती व सासूचा जामीन मंजूर केला.