महाराष्ट्राचा लाडका दशम हिंदकेसरी बकासुर असणार खास आकर्षण
रत्नागिरी:- लांजा तालुक्यातील खानविलकर मैदान येथे राज्यस्तरीय भव्य बैलगाडा शर्यतीचे आयोजन करण्यात आले आहे.दुपारी १२ ते २ या वेळेत स्पर्धेसाठी महाराष्ट्राचा लाडका दशम हिंदकेसरी बकासुर उपस्थित राहणार असल्याचे आयोजकांकडून कळवण्यात आले आहे.
विवली- केळंबे स्पोर्टस क्लब यांच्या माध्यमातून या राज्यस्तरीय बैलगाडा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. रविवार २ मार्च रोजी लांजा विवली आंबा बस स्टॉप येथील खानविलकर मैदानावर या भव्यदिव्य अशा बैलगाडा शर्यतीचा थरार रंगणार आहे. रविवारी सकाळी नऊ वाजता स्पर्धेचा नाव नोंदणीचा शुभारंभ होईल. या स्पर्धेचे खास आकर्षण महाराष्ट्राचा लाडका दशम हिंदकेसरी बकासुर
असणार आहे स्व चंद्रकांत उर्फ भाई जठार यांचा स्मरणार्थ उद्योजक दिनेश जठार व परिवार,
सौरभ मलुष्टे,
समीर पवार,अभिषेक सुर्वे व मित्र मंडळ यांचा सौजन्याने महाराष्ट्रात बैलगाडी स्पर्धेतील लोकप्रिय बकासुर याची विशेष उपस्थिती लाभणार आहे असे आयोजकांच्या वतीने कळवण्यात आले आहे.
राज्यस्तरीय बैलगाडा स्पर्धा चार गटात घेतली जाईल. यामध्ये राज्यस्तरीय गट, जिल्हास्तरीय गट, तालुकास्तरीय गट आणि गावठी गट अशा चार गटात स्पर्धा होणार आहे. राज्यस्तरीय गटात पहिल्या क्रमांकासाठी २१ हजार, द्वितीय क्रमांकासाठी १५ हजार आणि तृतीय क्रमांकासाठी ११ हजाराचे रोख बक्षीस ठेवण्यात आले आहे. जिल्हास्तरीय गटात पहिल्या पाच क्रमांकाच्या विजेत्यांना १५०००, १२०००, १००००, ७००० आणि पाच हजारांचे रोख बक्षीस दिले जाणार आहे. तालुकास्तरीय आणि गावठी गटात देखील पहिल्या पाच जणांना आकर्षक रोख पारितोषिक देण्यात येणार आहे. या स्पर्धेत सहभागी होऊ इच्छिणाऱ्या स्पर्धकांनी दीपक जठार 9060925005, विजय खानविलकर 9860228709, गणेश लांबोरे 7972643190, अभी खानविलकर 9011112534 या क्रमांकावर संपर्क करावा असे आवाहन करण्यात आले आहे.