रत्नागिरी:- टायपिंग, जातपडताळणी कागदपत्रांची पुर्तता न केल्यामुळे सेवानिवृत्तीच्या उंबरठ्यावर विभागीय चौकशीच्या घेर्यात सापडलेल्यांना क्षमापित करण्याचा प्रस्ताव तयार करण्याच्या सुचना जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. इंदुराणी जाखड यांनी दिल्या आहेत. त्यामुळे गेले काही महिने त्रस्त झालेल्या पन्नास कर्मचारी, अधिकार्यांना खर्या अर्थाने गणपती बाप्पा पावला आहे. यासंदर्भात लेखा संघटनेने पाठपुरावा केला होता.
जिल्हा परिषद प्रशासन सेवेत उत्तम सेवा बजावून निवृत्तीच्या वाटेवर असलेल्या कर्मचार्यांना टायपिंग, जातपडताळणी आदींची पुर्तत केली नसल्याचे कारण देत विभागीय चौकशीचा निर्णय घेण्यात आला होता. प्रशासनाकडून त्यांन नोटीसही बजावण्यात आली होती. यापुर्वी आठ ते नऊ कर्मचार्यांची चौकशीही सुुरु झाली आहे. त्यातील सामान्य प्रशासनमधील एका अधिकार्याला क्लिनचिट मिळाली होती. त्याचा आधार घेत अन्य सर्व कर्मचारी, अधिकार्यांनीही पावले उचलली आहेत. हा प्रश्न नव्याने पदभार घेतलेल्या सीईओ डॉ. जाखड यांच्यापुढे लेखा संघटनेने मांडला. त्यावळी सकारात्मक विचार केला जाईल असे आश्वासन सीईओंनी दिले. यासंदर्भात सीईओ डॉ. जाखड यांनी सामान्य प्रशासन अधिकारी अर्चना वाघमळे, कॅफो मारुती कांबळे, सहाय्यक लेखाधिकारी श्री. शिंदे, संघटना प्रतिनिधी यांची बैठक घेतली. सेवानिवृत्तीच्या उंबरठ्यावर असलेल्या या कर्मचार्यांना कसा दिलासा दिला जाईल यावर अधिकार्यांबरोबर चर्चा केली.
टायपिंग, जात पडताळणी प्रमाणपत्र सादर करण्याबाबत काही कर्मचार्यांना सुचना देण्यात आलेल्या होत्या. त्याचे पालन झालेले नाही. त्यानुसार आयुक्तांनी संबंधित कर्मचार्यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्याचे आदेश दिले होते. त्याप्रमाणे काहींनी खुलासा दिला आहे. त्यामध्ये योग्य ते कारण दिलेले नसल्याचे प्रशासन अधिकार्यांकडून सीईओंना सांगण्यात आले; मात्र सीईओंनी कर्मचारी, अधिकार्यांच्यादृष्टीने सकारात्मक पावले कशी उचलता येतील याकडे सर्वांचे लक्ष वेधले. सेवानिवृत्तीच्या उंबरठ्यावर कशापध्दतीने क्षमापित करता येतील यासाठी यादृष्टीने प्रस्ताव आयुक्तांकडे पाठवावा अशा सुचना सीईओंनी दिल्या आहेत. या निर्णयामुळे लेखा संघटनेकडून समाधान व्यक्त केले जात आहे.