विनामास्क फिरणाऱ्या नऊ जणांवर एकाच दिवशी गुन्हा दाखल 

रत्नागिरी:- कोरोना काळात तोंडाला मास्क न लावता हयगयीचे कृत्य केल्याप्रकरणी दोन वेगवेगळ्या घटनेत ९ जणांविरोधात  पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मंगळवार ११ जानेवारी रोजी ही कारवाई करण्यात आली. 

शहर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील मिरकरवाडा, भूतेनाका, चर्मालय याठिकाणी नबी सत्तार बागवान, इरफान जाकिर सय्यद (दोन्ही रा.लातूर),गणेश कृष्णा मयेकर (40,काळबादेवी), महेंद्र बबन सावंत (33,रा.पाली),ताजुद्दीन लतिफ कालसेकर (54,रा.अजमेरीनगर) यांच्यावर कारवाई करून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.हे सर्व जण कोरोना काळात स्वतःच्या तोंडाला मास्क न लावता तसेच नाकाला कपड्याने न झाकता हयगयीचे कृत्य करत असताना ही कारवाई करण्यात आली. याप्रकरणी अधिक तपास शहर पोलिस करत आहेत.
दुसऱ्या घटनेत ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीतील  कारवांचीवाडी,पाली याठिकाणी कारवाई करण्यात आली आहे. ईश्वर बाबू मांजरेकर (६१, रा. कारवांचीवाडी), रफिक बंदेनवाज मलावद (२३,रा.कुवारबाव), प्रदिप गणपत आमकर (३१,रा.खेडशी), पवन दत्तात्रय सावंत (३६,रा.पाली) अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या चार जणांची नावे आहेत.याबाबत अधिक तपास ग्रामीण पोलिस करत आहेत.