विद्यार्थ्यांचा शैक्षणिक पाया मजबूत करण्यासाठी ‘सेतू’ अभ्यासक्रम 

रत्नागिरी:- विद्यार्थ्यांचा शिक्षणातील पाया मजबूत व्हावा यासाठी नव्या शैक्षणिक वर्षात सेतू अभ्यासक्रमाची अंमलबजावणी केली जाणार आहे. मागील इयत्तेतील महत्वाच्या क्षमतांवर आधारित ३० दिवसांचा सेतू शाळांमध्ये शिकवला जाणार आहे.

राष्ट्रीय संपादणूक सर्वेक्षण २०२१ च्या अहवालामध्ये भाषा, गणित, विज्ञान आणि सामाजिक शास्त्र या विषयांमध्ये विद्यार्थ्यांचा पाया कच्चा असल्याचं समोर आलंय. या सर्वांचा परिणाम शालेय गुणवत्तेवर होत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे राज्य स्तरावर नव्या शैक्षणिक वर्षात सेतू अभ्यासक्रम शिकवला जाणार आहे. इयत्ता दुसरी ते दहावीच्या विद्याथ्यांसाठी मराठी, इंग्रजी सामान्य विज्ञान, गणित, सामाजिक शास्त्र या विषयांसाठी हा सेतू अभ्यासक्रम तयार करण्यात आला आहे. हा अभ्यासक्रम विषय निहाय आणि इयत्तानिहाय तयार करण्यात आला आहे. मागील इयत्तांच्या महत्त्वाच्या क्षमतांवर हा अभ्यासक्रम आधारित असणार आहे. कोरोनामुळे राज्यातील शाळा-महाविद्यालये बंद होती. त्यामुळे विद्यार्थी शाळेपासून वंचित आहेत. अशा सर्व परिस्थितीचा विचार करता, यंदा शाळा सुरू झाल्यानंतर अभ्यासक्रम सुरू करण्यापूर्वी प्रत्येक शाळेला हा ब्रिज कोर्स पर्ण करण्याच्या सचना शिक्षण विभागाच्या वतीने देण्यात आल्या आहेत. विद्याथ्यांच्या शैक्षणिक, मानसिक आणि सामाजिक दृष्टिकोनातून ब्रिज कोर्सचा अभ्यासक्रम असल्याने शाळा सुरू झाल्यानंतर थेट पाठ्यपुस्तकातील अभ्यासक्रम शिकवण्यापेक्षा यापूर्वी झालेले शैक्षणिक नुकसान भरून काढण्यासाठी हा ब्रिज कोर्स महत्त्वाचा आहे.