रत्नागिरी:- वाहतुक नियम धाब्यावर बसवित बेशीस्त वाहतुकीचे प्रमाण वाढताना दिसत आहे. तशी आकडेवारी समोर आली आहे. जिल्हा वाहतूक शाखेने ऑक्टोबर या एका महिन्यात एकूण ८ प्रकारे वाहतुकीचे विविध नियम तोडणाऱ्या ६ हजार ४७२ जणांवर कारवाई केली असून त्यांच्याकडुन ४० लाख ७० हजारांचा दंड वसूल केला आहे. जिल्हा वाहतूक शाखेचे सहायक पोलिस निरीक्षक दत्ता शेळके यांनी ही अधिकृत आकडेवारी दिली.
शासनाच्या नव्या वाहतुक नियमांची जिल्ह्यात काटेखोर अंमलबजावणी सुरू झाली आहे. त्यामुळे नियम तोडणाऱ्यांवर वचक बसविण्याचा वाहतूक शाखेचा प्रयत्न आहे. त्यानिमित्ताने नियम तोडणाऱ्यांविरोधात वाहतुक शाखेने कारवाईचा बगडा उगारला आहे. नियम मोडणाऱ्या वाहन चालकावर दंडात्मक कारवाईला सुरू आहे. फक्त ऑक्टोबर या एका महिन्यात सर्वाधिक कारवाई रस्तावर बेशिस्त वाहने उभी करणाऱ्यांवर करण्यात आली आहे. एका महिन्यात १ हजार ४६० जणांवार कारवाई करून त्यांच्याकडुन ९ लाख १ हजार रुपयाचा दंड वसूल केला आहे. नो एन्ट्री मध्ये वानने लावणाऱ्यावरही कारवाई करण्यात आली आहे. यामध्ये ७३२ जणांवर कारवाई करून साडे ४ लाखाचा दंड वसूल केला आहे. नो पार्किंग झोनमध्ये वाहने लावणाऱ्या १७ जणांवर कारवाई करून त्याच्याकवर न्यायालयात खटले दाखल करण्यात आले आहेत. ऑक्टोबर महिन्यात दिवाळी अल्याने वाहनांची वर्दळ वाढली होती. या काळातच वाहतुक शाखेने जोरदार करवाई केली. विना हेल्मेट , सीट बेल्ट न लावणे, मोबाईलवर बोलणे, यास फटाका सायलन्सर, वेगाने वाहने चालविणे आदी कारवाई या शाखेने केली आहे. ३ हजार १८० जणांवर कारवाई करून ऑक्टोबर महिन्यात १८ लाख ८३ हजार १५० रुपयाचा दंड वसूल केला आहे.