वाहतूक पोलिसाला शिवीगाळ, धक्काबुक्की; आरोपातून निर्दोष मुक्तता

रत्नागिरी:-  वाहतुकीस अडथळा निर्माण होईल अशाप्रकारे भर बाजारात कार पार्क करुन वाहतूक पोलिसालाच शिवीगाळ व धक्काबुक्की केल्याच्या आरोपातील संशयिताची न्यायालयाने मंगळवारी निर्दोष मुक्तता केली.ही घटना ७ सप्टेंबर २०१३ रोजी सायंकाळी ५.४५  वा.शिवाजी चौक देवरुख येथे घडली होती.         

अनिल प्रकाश रेडीज (४२ , मुळ रा.भांडूप, मुंबई) असे निर्दोष मुक्तता करण्यात आलेल्या चालकाचे नाव आहे. त्याच्याविरोधात वाहतूक पोलिस कर्मचारी श्रीनिवास सुरेश जानवलकर यांनी देवरुख पोलिसांकडे तक्रार दिली होती. त्यानूसार, ७ सप्टेंबर रोजी सकाळी ८ ते पासून ते शिवाजी चौक देवरुख येथे आपली सेवा बजावत होते. त्यावेळी त्यांना (एमएच-०८-आर-१०० ) ही कार वाहतूकीस अडथळा होईल अशा रितीने पार्क करण्यात आलेचे दिसून आले. त्यांनी याबाबत आजुबाजुला विचारणा केली असता तिचा चालक अनिल रेडीज हा बाजुच्या सलूनमध्ये गेला होता. जानवलकर यांनी रेडीजला गाडी बाजुस करुन वाहतुकीचा अडथळा दुर करण्यास सांगितले .तेव्हा त्याने जानवलकर यांना ही बने साहेबांची गाडी आहे असे म्हणत शिवीगाळ करुन तसेच त्यांच्या शर्टची कॉलर पकडून धक्काबुक्की केली होती.         याप्रकरणी श्रीनिवास जानवलकर यांनी देवरुख पोलिस ठाण्यात तक्रार दिली होती.त्यानुसार देवरुख पोलिसांनी अनिल रेडीजवर गुन्हा दाखल करुन न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले होते.