वाहतूकीस अडथळा होईल असे वाहन पार्क करणाऱ्या चालकाविरुद्ध गुन्हा

रत्नागिरी:- फणसवणे-कळंबस्ते तिठा (ता. संगमेश्वर) येथील रस्त्यावर वाहतूकीस अडथळा होईल असे वाहन पार्क करणाऱ्या वाहन चालकाविरुद्ध संगमेश्वर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विलास बुधाजी मालप (वय ४६, मधलीवाडी अणदेरी, ता. संगमेश्वर) असे संशयिताचे नाव आहे. ही घटना मंगळवारी (ता. २४) सायंकाळी साडेसहा च्या सुमारास कळंबस्ते तिठा येथील सार्वजनिक रस्त्यावर निदर्शनास आली.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार संशयितांना वाहतूकीस व रहदारीस अडथळा होईल अशी चारचाकी (क्र. एमएच-०८ झेड ६३१५) नऊ सिटर गाडी रस्त्यात रहदारीस व वाहतूकीस अडथळा होईल अशी पार्क केली. या प्रकरणी पोलिसांनी संगमेश्वर पोलिस ठाण्यात तक्रार दिली. तक्रारीवरुन पोलिसांनी संशयित चालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.