वाहतूकीस अडथळा करणाऱ्या चालकाविरुद्ध गुन्हा

रत्नागिरी:- रस्त्यावर वाहतूकीस व रहदारीस अडथळा होईल असे मोटार पार्क करणाऱ्या चालकाविरुद्ध राजापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल कऱण्यात आला आहे. शिवराम शांताराम मोरे (वय ५०, रा. जवळेधर, सुर्वेवाडी, ता. राजापूर) असे संशयिताचे नाव आहे. ही घटना गुरुवारी (ता. ६) राजापूर तालुक्यातील ओणी ते कोल्हापूर जाणाऱ्या रस्त्यावर पाचल एसटी बसस्थानक येथे निदर्शनास आली.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार संशयित शिवराम मोरे यांनी वाहतूकीस अडथळा होईल असे वाहन पार्क केले. या प्रकरणी पोलिस कॉन्स्टेबल रामदास पाटील यांनी राजापूर पोलिस ठाण्यात तक्रार दिली. तक्रारीवरुन पोलिसांनी संशयित चालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.