वारीशे खून प्रकरणातील आरोपी आंबेरकरचा जामिन अर्ज उच्च न्यायालयाने फेटाळला

राजापूर– मुंबई उच्च न्यायालयाने पत्रकार शशिकांत वारीशे खून प्रकरणातील आरोपी पंढरीनाथ आंबेरकर याचा जामिन अर्ज फेटाळून लावला आहे.

प्रथमदर्शनी आंबेरकर हा या प्रकरणात गुंतलेला असू शकतो असा निष्कर्ष काढून अर्ज निकाली करण्यात आला. हे प्रकरण उच्च न्यायालयाचे एकल खंडपीठ माधव जामदार यांच्या समोर सुनावणीस आले. फिर्यादी पक्षाने सादर केलेल्या प्रकरणावरुन दिसून येते की, अर्जदार पंढरीनाथ आंबेरकर ही प्रभावशाली व्यक्ती आहे. तिचे राजकीय नेत्यांशी संबंध आहेत. जर अर्जदाराला जामिन मंजूर केला तर साक्षीदारांवर प्रभाव पडू शकेल.

दस्तऐवजांचा विचार केला असता जामिन मंजूर करण्यास योग्य हे प्रकरण नाही, असे न्यायालयाने नमूद केले. 6 फेब्रुवारी 2023 रोजी राजापूरला हा प्रकार घडला होता. पत्रकार वारीशे हा पुढे गेल्याचे लक्षात आल्यावर आपल्या ऑफीसमध्ये बसलेल्या आंबेरकर याने कार घेतली आणि वारीशे यांना ठोकरले, असे फिर्यादी पक्षाचे म्हणणे आहे.

या प्रकरणात स्कूटर जवळपास 275 फूट लांब ओढली गेली. त्यानंतर आंबेरकरने आपली कार थांबवली असल्याचे तपास अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. आंबेरकर याचा गुन्हेगारीचा पूर्व इतिहास पोलिसांनी नमूद केला. शशिकांत वारीशे यांनी या ठार मारण्याचा हेतू होता.