वाडीचे नाव बदलल्याच्या रागातून शिविगाळ; गुन्हा दाखल

दापोली:- फणसू उगवतवाडी येथील राजेंद्र पाचकले याने वाडीचे नाव बदलल्याचा राग मनात धरून शिविगाळ केल्याची घटना १७ रोजी सायंकाळी ५.३० च्या सुमारास घडली.          

दापोली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार एक महिला शास्त्रीय संगीताचे क्लास घेत असताना राजेंद्र पाचकले याने तेथे येऊन तरुण सहाय्यक मंडळाने त्यांच्या वाडीचे बेर्डेवाडी हे नाव बदलून दुर्गावाडी ठेवले याचा राग मनात धरून मोठमोठ्याने ओरडून फिर्यादी महिला व त्याचे पती तसेच तरुण सहाय्यक मंडळातील सभासदांना शिविगाळ केली व ठार मारण्याची धमकी देऊन सभागृहात मुलांसमोर वाईट उद्देशाने फिर्यादी महिलेचा हात धरून तिच्या मनाला लज्जा उत्पन्न होईल, असे कृत्य केले. या फिर्यादीनुसार भा.दं.वि. ३५४ (१) अ५०४ ५०६ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा अधिक तपास दापोली पोलिस ठाण्याच्या पोलीस उपनिरीक्षक शीतल पाटील करीत आहेत.