रत्नागिरी:- जयगड सागरी पोलीस ठाणे येथे युवक बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल करण्यात आली आहे. राकेश अशोक जंगम (वय वर्ष २७, रा. वाटद खंडाळा, कोकण नगर, रत्नागिरी) असे बेपत्ता झालेल्या युवकाचे नाव आहे.
दि. ६ जून २०२४ रोजी रात्री ११ वाजता राकेश अशोक जंगम कोणलाही न सांगता वाटद खंडाळा, कोकण नगर येथून घराबाहेर पडला आहे, तो घरी परतला नसल्याने त्याची आई सौ. वंदना अशोक जंगम यांनी तक्रार दाखल केली आहे. त्याची उंची पाच फूट सहा इंच असून, रंग सावळा, उभट चेहेरा, वाढलेले काळे केस, दाढी, पायात चॉकलेटी रंगाचे बुट, निळ्या रंगाची ट्रॅक पँट, सोबत काळ्या रंगाची बॅग असे त्याचे वर्णन आहे. सदरील व्यक्ती कोणाला आढल्यास जयगड सागरी पोलीस ठाणे येथे खबर द्यावी, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.