वांद्री येथे अनधिकृत दारु विक्री, पोलिसांची कारवाई

रत्नागिरी:- वांद्री (ता. संगमेश्वर)गिराचा पऱ्या येथील झाडीझुडपाच्या आ़डोशाला अनधिकृत हातभट्टीची दारु विक्री करणाऱ्या संशयितावर पोलिसांनी कारवाई केली. या कारवाईत पोलिसांनी ९५० रुपयांची ९ लिटर दारु जप्त केली. संगमेश्वर पोलिस ठाण्यात संशयिताविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गजानन शंकर किर (रा. वांद्री, ता. संगमेश्वर) असे संशयिताचे नाव आहे. ही घटना बुधवारी (ता. २८) सायंकाळी साडेसहाच्या सुमारास गिराचा पऱ्या वांद्री येथील झाडीझुडपाच्या आडोशाला निदर्शनास आली.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार संशयित विनापरवाना हातभट्टीची ९५० रुपयांची ९ लिटर दारु विक्रीसाठी ठेवलेल्या स्थितीत पोलिसांच्या निदर्शनास आला. या प्रकरणी पोलिस कॉन्स्टेबल राहूल खरपे यांनी संगमेश्वर पोलिस ठाण्यात तक्रार दिली. तक्रारीवरुन पोलिसांनी संशयिताविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.